मुंबई - अभिनेता सोनू सूद गेल्या काही दिवसांपासून स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी परतवण्यासाठी मदत करत आहे. या कामामुळे सोनूचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. सोशल मीडियावर सोनूच्या नावाचा हॅश्टॅगदेखील ट्रेंड होत आहे. अशात आता एका महिलेने सोनूकडे अजब तक्रार केली आहे. याला सोनूनेदेखील मजेशीर उत्तर दिले आहे.
पतीसोबत राहून कंटाळलेल्या महिलेने सोनू सूदकडे मागितली मदत, अभिनेत्याने दिले मजेशीर उत्तर - सोनू सूदकडे महिलेची पतीबाबत तक्रार
महिलेने ट्विटरवर लिहिले, की सोनू सूद मी जनता कर्फ्यूपासून लॉकडाऊन 4 पर्यंत माझ्या पतीसोबतच रहात आहे. कृपया तुम्ही मला किंवा माझ्या पतीला माझ्या माहेरी पाठवा. कारण मी आणखी काळ त्याच्यासोबत राहू शकत नाही. यावर सोनूने मजेशीर उत्तर दिले आहे.
या महिलेने ट्विटरवर लिहिले, की सोनू सूद मी जनता कर्फ्यूपासून लॉकडाऊन 4 पर्यंत माझ्या पतीसोबतच राहात आहे. कृपया तुम्ही मला किंवा माझ्या पतीला माझ्या माहेरी पाठवा. कारण मी आणखी काळ त्याच्यासोबत राहू शकत नाही. यावर सोनूने मजेशीर उत्तर दिले आहे. तो म्हणाला, मी तुम्हाला दोघांनाही गोव्याला सोडून येतो. काय म्हणता? असा सवालही त्याने पुढे केला आहे.
सोनूने नुकतीच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्याने आपल्या कामांची माहिती कोश्यारी यांना दिली. सोनूच्या या कामाचे कौतुक करत राज्यपालांनी त्याला पूर्ण मदत करण्याचे आश्वासनही दिले. सोबतच या भेटीचा फोटो गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र या ट्विटर हँडलवरुन शेअरदेखील केला.