बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कोरोना काळात प्रवासी मजूर आणि गरजवंतांचा देवदूत म्हणून ओळखला जातो. हजारो प्रवासी मजूरांना त्याने सुखरुप घरी पोहोचवले आहे. कोरोना रुग्णांसाठी औषधे, बेड उपलब्ध करणे, ऑक्सिजन पुरवठा करणे असी अनेक लोकोपयोगी कामे तो करीत असतो. रोज त्याच्या दारात असंख्य गरजवंत आपली गाऱ्हाणे घेऊन येतात आणि त्यांना तो आश्वस्तकरुन पाठवतो. हजारो लोकांनी आजवर त्याला आशीर्वाद दिला आहे. अशा या सोनू सूदने आपला मुलगा इशांत सूदसाठी नवीन लॉन्च झालेली मर्सिडीस - मेबॅक जीएलएस ६०० ही गाडी भेट म्हणून दिली आहे. यूट्यूबवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये सोनू सूद कारची डिलिव्हरी घेताना आणि आपल्या मुलांना ड्राईव्हसाठी घेऊन जाताना दिसला आहे.
काळ्या रंगाची मर्सिडीस - मेबॅक जीएलएस ६०० गाडी सोनू सूद स्वतः चालवताना व्हिडिओत दिसत आहे. या कारमध्ये मायबॅक जीएलएसच्या डॅशबोर्डसह प्रीमियम नप्पा लेदर, ट्रिम इन्सर्ट, ट्विन १२.३ -इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, पाच सीटचे व्हर्जन आणि अशी बरेच काही आश्चर्यकारक वैशिष्ट्ये आहेत. जीएलएस ६००चे पॉवरट्रेन ४.० व्ही ८ एन्जिनला ४८ व्ही माईल्ड हायब्रीड सिस्टम आहे. जीएलएस ६००च्या पॉवरट्रेनला ४.० लिटर व्ही ८ इंजिन आहे ज्यास ४८व्ही माइल्ड-हायब्रीड सिस्टम मिळते. यात जास्तीत पॉवर वीज ५५७ PS आणि ७३० एनएम मिळते.