मुंबई- लॉकडाऊनच्या काळात सोनू सूदने आत्तापर्यंत बर्याच प्रवासी कामगारांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवले. यामुळे स्थलांतरित मजूरांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाला काही अंशी मदत झाली. आता पुन्हा 5 जून रोजी संध्याकाळी अभिनेता सोनूने वडाळा टीटी येथून 220 लोकांसाठी बसेसची व्यवस्था केली.
सोनू सूदची स्थलांतरित कामगारांना मदत, मुंबईतून आणखी पाच बस रवाना - sonu sood helps migrants
वडाळा येथून २ बस उत्तराखंड, एक बस तामिळनाडू आणि 3 बस उत्तर प्रदेशला रवाना झाल्या. सोनू सूदने याआधीही मुंबईतून अनेक स्थलांतरित कामगारांना सुखरूप त्यांच्या गावी पोहोचवले आहे. यानंतर आज आणखी 220 लोकांना घरी पोहोचवण्याचे काम सोनुने केले आहे.

लॉकडाऊनमुळे स्थलांतरित कामगारांचा प्रश्न ऐरणीवर आला. यानंतर घरी जाण्यासाठी कामगार प्रयत्न करू लागले. परिणामी, अनेकजण पायी, माल वाहतूक करणाऱ्या वाहनांनी प्रवास करु लागले. यादरम्यान अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अशा परिस्थितीत सोनू सूद कामगारांच्या मदतीसाठी धावून आला. त्याने अनेक कामगारांना सुखरूपरित्या घरी पोहोचवले. सोबतच प्रवासादरम्यान त्यांच्या जेवणाची व्यवस्थाही केली. या उपक्रमामुळे सोनूचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.