महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सोनू सूदने 19 वर्षीय अपघातग्रस्त तरुणाला वाचवले - पाहा व्हायरल व्हिडिओ - कार अपघातातील तरुणाला सोनूने वाचवले

सोनू सूदने पंजाबमधील त्याच्या मूळ गावी मोगा येथे एका गंभीर रस्ता अपघातात 19 वर्षांच्या मुलाचे प्राण वाचवले. अपघातग्रस्त कारची अवस्था पाहून अभिनेत्याने बाहेर पडून बेशुद्ध अवस्थेत असलेल्या तरुणाला वाचवले.

सोनू सूदने 19 वर्षीय अपघातग्रस्त तरुणाला वाचवले
सोनू सूदने 19 वर्षीय अपघातग्रस्त तरुणाला वाचवले

By

Published : Feb 9, 2022, 1:19 PM IST

मुंबई (महाराष्ट्र) - पंजाबमधील मोगा येथे सोमवारी झालेल्या भीषण अपघातानंतर बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने १९ वर्षीय मुलाचे प्राण वाचवले. सोनू जात असलेल्या उड्डाणपुलावर हा अपघात झाला होता.

अपघातग्रस्त कारची अवस्था पाहून अभिनेत्याने बाहेर पडून बेशुद्ध अवस्थेत असलेल्या मुलाला वाचवले. कारला सेंट्रल लॉक असल्यामुळे प्रकरण अवघड झाले होते. त्यामुळे अपघातग्रस्त तरुणाला गाडीतून बाहेर काढण्यासाठी थोडा वेळ लागला पण लगेचच त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुलाला रुग्णालयात वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाले आणि आता तो बरा आहे. यापूर्वी देखील सोनूने कोरोना साथीच्या आजारात हजारो गरजूंची मदत केली होती.

हेही वाचा -Oscars 2022 Nominations: 'द पॉवर ऑफ द डॉग'ला १२ नामांकने, पाहा संपूर्ण यादी

ABOUT THE AUTHOR

...view details