मुंबई - कोरोना विषाणूचा जगभर वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य कर्मचारी, पोलीस यंत्रणा, अन्नपुरवठा कर्मचारी, सफाई कामगार हे सर्व प्रचंड मेहनत घेत आहेत. अशा परिस्थिती नागरिकांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्यासाठी कलाविश्वातील कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून काही ना काही सकारात्मक पोस्ट शेअर करत असतात. कोरोनाच्या लढ्यात आर्थिक मदतीसाठी देखील बरेच कलाकार पुढे आले आहेत. अभिनेता सोनू सुदने देखील या लढ्यात मदत केली आहे. तसेच, त्याने आपल्या एका कवितेतून कोरोना योद्ध्यांचे आभार मानले आहेत.
सोनू सुदने मुंबईतील २५ हजारापेश्रा अधिक प्रवाश्यांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था केली आहे. याशिवाय एका अभियानाअंतर्गत तो दररोज ४५ हजार लोकांपर्यंत जेवण पुरवठा करत आहे. तसेच त्याने आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी जुहू येथील हॉटेल राहण्यासाठी दिले आहे.
आता सोनूने एक भावनात्मक कविता लिहिली आहे. या कवितेला त्यानेच आवाज दिला आहे.