मुंबई- अभिनेता सोनू सूदने २५ वर्षाची तरुणी भारतीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर भावनिक पोस्ट लिहून श्रध्दांजली वाहिली आहे. भारतीला नागपूरहून हैदराबादला नेण्यासाठी सोनू आणि त्यांच्या टीमने व्यवस्था केली होती पण कोरोनामुळे तिची प्राणज्योत माळवली.
शनिवारी सोनूने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली की, "हैदराबादला एअर अॅम्ब्युलन्समधून विमानाने प्रवास केलेल्या नागपूरच्या भारतीचे काल रात्री निधन झाले. रेस्ट इन पॉवर माझ्या प्रिय भारती. शेवटच्या महिन्यात तू इक्मो मशिनवर वाघिणीप्रमाणे झुंज दिली होतीस. मी जरी तुला भेटलो नसलो तरी माझ्या ह्रदयात तुझ्यासाठी खास जागा आहे. तुझ्या संपूर्ण कुटूंबियांबद्दल माझ्या संवेदना आहेत. मी लवकरच त्यांना भेटेन. तुझी आठवण येईल भारती.''
“हे जग नेहमीच तुझी आठवण ठेवेल,” सोनूने ब्रेक हार्ट इमोजीसह कॅप्शनमध्ये लिहिले.