महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सोनू सूद बर्थडे स्पेशल : रिएल लाईफ हिरोचा वाढदिवस..! - Today is Sonu Sood's 47th birthday

अभिनेता सोनू सूदचा आज ४७ वा वाढदिवस आहे. प्रवासी मजुरांना केलेल्या मदतीमुळे पडद्यावरचा हा व्हिलन खऱ्या आयुष्यात हिरो ठरला आहे. त्याने देशातील स्थलांतरीत मजुरांना मदत करण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत, त्याच्या 47 व्या वाढदिवशी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अतिरिक्त तीन लाख नोकरी देण्याची घोषणा त्याने केली आहे.

Sonu Sood Birthday Special
सोनू सूद बर्थडे स्पेशल

By

Published : Jul 30, 2020, 5:32 PM IST

मुंबई - तेलुगु, तामिळ, कन्नड आणि पंजाबीसह बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेता सोनू सूदचा आज ४७ वा वाढदिवस आहे.

रिएल लाईफ हिरोचा वाढदिवस..!!

सोनूला पडद्यावर खलनायक साकारताना आपण सर्वांनी पाहिलंय. त्याच्या रांगड्या अभिनयाचे खूप कौतुकही होत असते. पडद्यावरचा हा खलनायक खऱ्या जीवनात मात्र हिरो ठरल्याचे गेल्या काही महिन्यापासून आपण पाहिले आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर भारतात लॉकडाऊन सुरू झाले. अचानक उद्योग व्यवसाय बंद झाल्यामुळे रोजंदारीवर जगणाऱ्या मजुरांचे हाल सुरू झाले. त्यांना आपल्या घरी परत जायचे होते. पण जाणार कसे? रेल्वे बंद, बसेस बंद, खासगी वाहन परवडणारे नव्हते. शिवाय वेगवेगळ्या राज्यात जाण्यासाठी अनेक परवानग्यांचीही गरज होती. अशावेळी या मजुरांनी आपल्या कुटुंब कबिल्यासह चालत गावाचा रस्ता धरला.

रिएल लाईफ हिरोचा वाढदिवस..!!

मुंबईतून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहारसह देशातील विविध प्रांतात लोक चालत जाऊ लागले. अन्नधान्य नाही, पैसा नाही अशा कफल्लक अवस्थेत लोकांनी मार्गक्रमण करायला सुरुवात केली होती. अशावेळी हजारो प्रवासी मजुरांचा मसिहा बनून सोनू सूद पुढे आला. त्याने एक मोहिम हाती घेतली आणि शेकडो बसेसमधून लोकांना आपल्या राज्यात पाठवायला सुरुवात केली. त्याच्या कामाचा धडाका आश्चर्यचकित करणारा होता. अक्षरशः हजोरा प्रवासी मजुरांनी त्याने आपल्या राज्यात, गावात सुखरुप पोहोचवले.

रिएल लाईफ हिरोचा वाढदिवस..!!

एवढ्यावर न थांबता त्याने महाराष्ट्राबाहेर अडकलेल्या प्रवासी मजुरांचीही काळजी घ्यायला सुरुवात केली. ओडिशा राज्यातील शेकडो नर्स केरळ राज्यात अडकल्या होत्या. ही बातमी सोनूला कळताच त्याने चक्रे फिरवली, परवानग्या घेतल्या. यासाठी त्याने बंगळुरूहून खासगी विमानाची सोय केली आणि या शेकडो नर्सेसना ओडिशातील आपल्या कुटुंबीयांपाशी सुखरूप पोहोचवले.

रिएल लाईफ हिरोचा वाढदिवस..!!

हेही वाचा - सोनू सूदने वाढदिवसानिमित्त स्थलांतरीत मजुरांसाठी 3 लाख नोकर्‍या केल्या जाहीर

आपल्या श्वासात दम आहे तोपर्यंत हे काम सुरू ठेवणार, असे ठरवून तो या कार्यासाठी मैदानात उतरला होता. देशातील प्रत्येत अडचणीत असलेल्या मजुराला घरी पोहोचवण्याचा विडाच त्याने उचलला आणि त्यात तो यशस्वी ठरला. शिक्षणासाठी घरापासून दूर गेलेल्या विद्यार्थ्यांच्याही मदतीला सोनू धावला. खरंतर सोनूही विद्यार्थी असताना नागपुरात इंजिनिअरिंगसाठी होता. त्यामुळे घरापासून दूर असणाऱ्या विद्यार्थ्यांची दुःखे त्याने ओळखली होती. या विद्यार्थ्यांना सुखरुप घरी आणण्यात त्याने मोलाची मदत केली.

रिएल लाईफ हिरोचा वाढदिवस..!!

सोनू सूदचा आज ४७ वा वाढदिवस साजरा होतो. लाखो चाहत्यांनी त्याला शुभेच्छा देऊन दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आहे. पंजाबमधील एका छोट्या शहरातून मुंबईत आलेल्या सोनूने आपली अभिनेत्या पलीकडची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या चित्रपट कारकिर्दीवर नजर टाकली तर तो पडद्यावर खलनायक म्हणून हिट ठरला आहे आणि खऱ्या आयुष्यात तो लाखोंच्या मदतीला धावून जाणारा हिरो ठरला आहे. त्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या सदिच्छा!!

ABOUT THE AUTHOR

...view details