महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

केरळमध्ये अडकलेल्या १६९ मुलींना सोनू सूदने विमानाने पाठवले ओडिशाला - सोनू सूद

लॉकडाऊनमुळे केरळमध्ये कामासाठी आलेल्या १६९ मुलींना विमानाने भुवनेश्वरला पाठवण्यात आले. अभिनेता सोनू सूदने अथक प्रयत्न करुन या मुलींना आपल्या घरी सुखरुप पोहोचवले आहे.

sonu-sood-airlifts-169-odia-girls-from-kerala
१६९ मुलींना सोनू सूदने विमानाने पाठवले ओडिशाला

By

Published : May 29, 2020, 6:58 PM IST

मुंबई -अभिनेता सोनू सूदने शुक्रवारी १६९ मुलींना ओडिशातील त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला. लॉकडाऊनमध्ये केरळमध्ये अडकलेल्या या मुलींच्या मदतीला सोनू धावून आला. त्यांच्यासाठी त्याने खास विमानाची सोय केली होती. केरळच्या एर्नाकुलममधून त्या मुलींना विमानाने ओडिशात आणण्यात आले. या मुली ओडिशामधील असून तिथे टेक्स्टाईलमध्ये त्या शिलाईचे आणि एम्ब्रॉयडरीचे काम करीत होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशातील या मुली केरळमध्ये अडकल्याचे माहिती सोनू सूदला त्याच्या भुवनेश्वरमधील जवळच्या मित्राकडून समजली. त्यानंतर लगेच त्याने त्यांच्या मदतीसाठी पावले उचलली. सोनूने कोची आणि भुवनेश्वरमधील विमानतळ खुले होण्यास परवानगी मिळवण्यासाठी सरकारकडे प्रयत्न सुरू केले. या मुलींसाठी बंगळूमधून खास विमान कोचीला बोलावले. त्यांना भुवनेश्वरला पोहोचवायचे होते. ज्यामुळे त्या मुली भुवनेश्वरमध्ये त्यांच्या कुटुंबीयांना भेटू शकतील. दोन तासाच्या प्रवासानंतर या मुली भुवनेश्वरला पोहोचल्या आणि त्यानंतर त्या आपल्या घरी सुखरुप पोहोचल्या.

राज्यसभेचे खासदार अमर पटनाईक यांनी ट्विटरवरुन सोनू सूदचे या उदात्त कामासाठी आभार मानले आहेत. अभिनेता सोनू सूद आणि त्याची मैत्रीण निती गोयल यांनी लाखो भारतीयांसाठी 'घर भेजो' अभियान चालवून भारतीयांची मने जिंकली आहेत. सोनूने लॉकडाऊनच्या काळात मुंबईत अडकून पडलेल्या मजुरांसाठी असंख्य बसेस उपलब्ध करुन दिल्या. त्याने कर्नाटक, बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशात जाणाऱ्या मजूरांना बसेसमधून पाठवले. अलिकडेच सोनूने प्रवाशी मजूरांच्या मदतीसाठी हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details