मुंबई- पार्श्वगायक सोनू निगमने नुकतंच एका अभिनेत्याचे नाव न घेता त्याच्यावर पावर प्लेचा आरोप केला होता. सोबतच म्युझिक इंडस्ट्री ही एखाद्या माफियाप्रमाणे चालवली जात असल्याचे त्यानं म्हटलं होतं. यानंतर गायकाने आता टी सीरिजचे चेअरमन आणि एमडी भूषण कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे.
सोनू निगमने सोमवारी सकाळी आपल्या इन्स्टाग्रामवरून एक व्हीडिओ शेअर केला. याला त्यानं कॅप्शन दिलं, 'लातों के माफिया बातों से नहीं मानते'. या व्हीडिओत सोनू म्हणत आहे, भूषण कुमार आता तर तुझं नाव घ्यावंच लागेल मला आणि आता तू तू म्हणण्याच्याच लायकीचा आहेस. तू चुकीच्या माणसाच्या नादी लागला आहेस.