मुंबई- शाहिद कपूर स्टारर 'जर्सी'मधील 'बलीये रे' हे तिसरे गाणे रिलीज होताच धमाल करत आहे. सचेत-परंपरा या संगीतकार जोडीने रचलेल्या रोमँटिक गाण्यात शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर झळकले आहेत. गाण्याबद्दल बोलताना सचेत-परंपरा म्हणाले- 'बलीये रे' हे एक रोमँटिक गाणे आहे. गाण्यातील शाहिद आणि मृणालची केमिस्ट्री तुम्हाला तुमच्या सीटवर खिळवून ठेवेल.
चित्रपटाचे निर्माते अमन गिल म्हणाले की, 'बलीये रे' हे सचेत-परंपराचे अप्रतिम गाणे आहे. तुम्ही आत्तापर्यंत त्यांच्या संगीताला दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत आणि मला आशा आहे की तुम्ही 'बलीये रे'चा देखील आनंद घ्याल.
गौतम तिन्ननुरी दिग्दर्शित या चित्रपटात शाहिद कपूर दोन वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. चित्रपटाची कथा एका अयशस्वी क्रिकेटपटूभोवती फिरते. तो भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करण्याच्या आशेने 3 दशकांनंतर क्रिकेटमध्ये परतण्याचा निर्णय घेतो आणि त्याच्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला एक जर्सी भेट दिली जाते.