मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर पती आनंद आहुजासोबत वर्षभराहून अधिक काळ यूकेमध्ये राहिल्यानंतर गेल्या महिन्यात भारतात परतली होती. 14 ऑगस्टला ती बहिण रिया कपूर आणि करण बूलानी यांच्या लग्नासाठी भारतात परतली होती. या विवाह सोहळ्यासाठी आनंदही सहभागी झाला परंतु नंतर तो दिल्लीला घरी रवाना झाला होता. याला आता पंधरवडा पूर्ण झाला आहे आणि सोनमला त्याचा विरह सहन होईना झालाय.
सोनमने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला ज्यामध्ये तिचा नवरा तिचा हात हातात घेताना दिसत आहे. फोटो शेअर करताना सोनमने लिहिले, "मला तुझी खूप आठवण येते ... तुला भेटण्यासाठी वाट पाहू शकत नाही." या फोटोत सोनम चमकदार गुलाबी ड्रेस परिधान करताना दिसत आहे तर आनंद नेव्ही ब्लू ब्लेझरमध्ये मॅचिंग पॅंट आणि पांढऱ्या टी-शर्टसह दिसत आहे.