मुंबई- सध्या सोशल मीडियावर अनेक नवनवीन ट्रेंड सुरू आहेत. यात १० ईअर चॅलेंज असो वा फेस अॅप फिल्टर, याची सामान्यांसोबतच कलाकारांमध्येही क्रेझ पाहायाला मिळत आहे. अशात आता ट्विटरवर ट्रेंड होत असलेलं साडी चॅलेंजही कलाकारांनी मोठ्या उत्साहानं पूर्ण केलं आहे.
सोशल मीडियावर ‘साडी चॅलेंज’ची क्रेझ, सोनमचा फोटो पाहून व्हाल थक्क - ayushmann khurana
नुकतंच आयुष्माननेही हे चॅलेंज स्वीकारत आपला एक साडीतील फोटो पोस्ट केला होता. ज्यानंतर आता आपल्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या सोनमनेही आपला एक साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
नुकतंच आयुष्माननेही हे चॅलेंज स्वीकारत आपला एक साडीतील फोटो पोस्ट केला होता. ज्यानंतर आता आपल्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या सोनमनेही आपला एक साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र, सोनमचा हा फोटो चांगलाच चर्चेत आला आहे.,
याचं कारण असं, की सोनमनं साडीतील दोन फोटो शेअर केले आहेत. एक तिच्या लहानपणीचा फोटो असून यात तिनं साडी नेसली आहे तर दुसरा लग्नानंतरचा साडीमधील फोटो आहे. आधी आणि नंतर असं कॅप्शन देत सोनमनं शेअर केलेले हे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. दरम्यान सोनम लवकरच द झोया फॅक्टर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यानिमित्ताने ती पहिल्यांदाच दाक्षिणात्य अभिनेता सलमान दुल्करसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.