मुंबई- अभिनेत्री सोनम कपूर 'द झोया फॅक्टर' या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती वेगळ्या भूमिकेत दिसेल. याचा प्रत्यय नुकताच प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरवरुन येतो. या पोस्टरचे वेगळेपण डोळ्यात भरण्यासारखे आहे.
'द झोया फॅक्टर'मध्ये सोनम कपूरचा क्रिकेटच्या देवीचा अवतार - Sonam Kapoo
'द झोया फॅक्टर' चित्रपटात सोनम कपूर एका नव्या अवतारात पाहायला मिळणार आहे. याचे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे.
या पोस्टरमध्ये सोनम देवीच्या रुपात दिसत आहे. तिच्या डाव्या हातामध्ये क्रिकेटची बॅट असून उजव्या हातात हेल्मेट दिसते. गळ्यामध्ये पुष्पहार आणि दागिने दिसतात. भरजरी साडी परिधान केलेल्या देवीसदृष्य सोनमच्या मागे वलय निर्माण झाल्याचा भास निर्माण करण्यात पोस्टरला यश आलंय.
'द झोया फॅक्टर' हा चित्रपट अभिषेक शर्मा दिग्दर्शित करणार असून फॉक्स स्टार स्टुडिओ, पूजा शेट्टी आणि आरती शेट्टी यांची ही निर्मिती आहे. दलकेर सलमान आणि सोनम कपूरची जोडी पडद्यावर पाहायला मिळेल. हा चित्रपट २० सप्टेंबरला प्रदर्शित होईल.