महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

"अँड जस्ट लाइक दॅट" मालिकेत साडीचा अपमान, सोनम कपूर नाराज - फॅशनिस्टा सोनम कपूर नाराज

सेक्स अँड द सिटी रीबूट अँड जस्ट लाइक दॅट या मालिकेतील दिवाळी एपिसोडमध्ये भारतीय पोशाखांचे चुकीचे वर्णन केल्याबद्दल बरीच टीका होत आहे. अभिनेत्री सोनम कपूर या मालिकेतील सारा जेसिका पार्करवर नाराज झाली आहे. कारण तिचे ऑन-स्क्रीन पात्र कॅरी ब्रॅडशॉ साडी खरेदी करण्यासाठी जाते आणि साडी म्हणून लेहेंगा परिधान करते, यामुळे भारतीय साडीचा अपमान झाल्याचे सोनमला वाटत आहे.

अभिनेत्री सोनम कपूर
अभिनेत्री सोनम कपूर

By

Published : Jan 8, 2022, 1:53 PM IST

मुंबई - एचबीओ मॅक्सवर सेक्स अँड द सिटी रीबूट अँड जस्ट लाइक दॅट ही मालिका खूप चर्चेत असते. या मालिकेचे जगभर चाहते आहेत. या मालिकेतील दिवाळी एपिसोडमध्ये भारतीय पोशाखांचे चुकीचे वर्णन केल्याबद्दल बरीच टीका होत आहे. अभिनेत्री सोनम कपूर सारखी सेलिब्रिटी या मालिकेतील अभिनेत्री सारा जेसिका पार्करवर नाराज झाली आहे. कारण तिचे ऑन-स्क्रीन पात्र कॅरी ब्रॅडशॉ साडी खरेदी करण्यासाठी जाते आणि साडी म्हणून लेहेंगा परिधान करते, यामुळे भारतीय साडीचा अपमान झाल्याचे सोनमला वाटत आहे.

सोनमने दिवाळी एपिसोडमध्ये कॅरीच्या साडी ऐवजी लहेंगा परिधान केल्याची चर्चा वाढवण्यासाठी तिच्या सोशल मीडियाचा वापर केला. हिंदी चित्रपटसृष्टीतील फॅशनिस्टा असलेल्या या अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर भारतीय वंशाच्या कॅनेडियन इमरान आमदने शेअर केलेल्या पोस्ट शेअर केल्या आहेत. इमरान आमद हे द बिझनेस ऑफ फॅशनचे संस्थापक आहेत.

सोनमने कॅरीबद्दल नाराजी व्यक्त करत इम्रानची पोस्ट पुन्हा शेअर केली. यात म्हटलंय की, ज्यांना संस्कृतीबद्दल माहिती नाही त्यांची दिशाभूल होऊ शकते. सोनमने या विषयावर तिचे मत व्यक्त केले नसले तरी, इंस्टाग्राम स्टोरीजच्या स्ट्रिंगवरून हे स्पष्ट होते की अभिनेत्री सोनमदेखील इम्रानने त्याच्या दीर्घ पोस्टमध्ये काय म्हटले आहे त्याचे समर्थन करीत आहे.

या एपिसोडमध्ये, कॅरी आणि तिची मैत्रिण सीमा 'साडीचे दुकान' म्हणून ओळखल्या जाणार्‍या ठिकाणी फिरत आहेत. तिथे प्रेक्षकांना दिसणारे सर्व पोशाख खरेतर लेहेंगा आहेत. पण 'लेहेंगा' हा शब्द दोन्हीपैकी एकानेही कधीच उच्चारला नाही. कॅरी ब्रॅडशॉ साडी खरेदी करण्यासाठी जाते आणि साडी म्हणून लेहेंगा परिधान करते. अनेकांनी साडीच्या पराभवाचे श्रेय निर्मात्यांच्या भारतीयत्वाने भारावून न घेण्याच्या स्पष्ट निर्णयाला दिले, कारण इंग्रजीत लहेंग्यापेक्षा साडी हा शब्द जास्त लोकप्रिय आहे.

हेही वाचा -मृत्यूसाठी शुभेच्छा देणाऱ्या ट्रोलर्सना स्वरा भास्करचे सडेतोड उत्तर

ABOUT THE AUTHOR

...view details