महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

लंडनमध्ये सोनम कपूरने घेतली उबेर ड्रायव्हरची धास्ती, दिला सावधानतेचा इशारा - सोनम कपूरने घेतली उबेर ड्रायव्हरची धास्ती

सोनम कपूरला उबेरच्या टॅक्सीतून लंडनमध्ये फिरण्याचा वाईट अनुभव आला. खासगी ट्रान्सपोर्ट ऐवजी सार्वजनिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करण्याचा लोकांना तिने सल्ला दिला आहे.

Sonam Kapoor
सोनम कपूर

By

Published : Jan 16, 2020, 3:03 PM IST


मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने लंडनमधील टॅक्सी प्रवासाचा अनुभव शेअर केला आहे. सोनमसाठी हा भयानक प्रसंग होता.

सोनमने सोशल मीडियावर ट्विट करत आपला अनुभव सांगितला आहे. तिने लिहिलंय, ''अलिकडेच उबेरच्या बाबतीत जे घडले ते फार भयानक होते. म्हणून मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करा.''

यावर तिला एका युजरने नेमके काय घडल्याचे विचारले असता तिने लिहिलंय, ''ड्रायव्हर अस्थिर होता आणि सतत ओरडत होता. शेवटी मी वाईट तऱ्हेने घाबरले.'' यानंतर उबेरने सोनमला तपशील मागितला आहे.

उबेरच्या वतीने प्रतिक्रिया देण्यात आलीय. त्यांनी लिहिलंय, ''याबद्दल ऐकून वाईट वाटलं, सोनम. तुम्ही आपला मोबाईल नंबर आणि इमेल पाठवून सहकार्य कराल तर याबद्दल चौकशी करता येईल.''

यावर सोनमने म्हटलंय, ''मी तुमच्या अॅपवर तक्रार करण्याचा प्रयत्न केला. पण बऱ्याच वेळा डिसकनेक्टचे उत्तर मिळाले. तुम्हाला सिस्टम अपडेट करण्याची आवश्यकता आहे. याहून अधिक तुम्ही काही करु शकत नाहीत.''

अलिकडे सोनमने ब्रिटिश एअरवेजच्या बाबतीत अशीच तक्रार केली होती. तिचे सामान असलेली बॅग या कंपनीच्या विमानात दोनदा हरवली होती.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details