महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सोनाक्षी आणि परिणीतीची बॉक्स ऑफिसवर टक्कर, कोण मारणार बाजी? - parineeti chopra

'जबरिया जोडी' चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये आतापर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. सुरूवातीला हा चित्रपट १७ मेला प्रदर्शित होणार होता. नंतर १२ जुलैला हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सोनाक्षी आणि परिणीतीची बॉक्स ऑफिसवर टक्कर

By

Published : Jun 27, 2019, 7:44 PM IST

मुंबई- सोनाक्षी सिन्हाची मुख्य भूमिका असलेला 'खानदानी शफाखाना' हा चित्रपट २६ जुलैला प्रदर्शित होणार होता. मात्र, आता या चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला असून हा सिनेमा आता २ ऑगस्टला सिनेमागृहात झळकणार आहे. याच दिवशी परिणीती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या मुख्य भूमिका असलेला 'जबरिया जोडी' चित्रपटही प्रदर्शित होणार आहे.

हे दोन्ही चित्रपट २ ऑगस्टलाच सिनेमागृहात झळकणार असल्यामुळे बॉक्स ऑफिसवर सोनाक्षी आणि परिणीतीची टक्कर पाहायला मिळणार आहे. जबरिया जोडी चित्रपटात सोनाक्षी एका पंजाबी मुलीच्या भूमिकेत झळकणार आहे. तर यात सोनाक्षीशिवाय वरूण शर्मा आणि बादशाह यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

'जबरिया जोडी' चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये आतापर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. सुरूवातीला हा चित्रपट १७ मेला प्रदर्शित होणार होता. नंतर १२ जुलैला हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, याच दिवशी हृतिक रोशनचा सुपर ३० चित्रपटही रिलीज होणार असल्यानं एकता कपूरनं या तारखेत बदल करत २ ऑगस्ट ही तारीख जाहीर केली आहे. अशात आता सोनाक्षीचा खानदानी शफाखाना प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचून आणणार की परिणीती आणि सिद्धार्थची जबरिया जोडी प्रेक्षकांची मनं जिंकणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details