महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

येत्या २६ जुलैला झळकतोय सोनाक्षी सिन्हाचा नवा सिनेमा , जाणून घ्या शीर्षक..! - Rapper Badshah

सिन्हाने आपल्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. अभिनेता वरुण शर्मा, अन्नु कपूर, शिल्पी दास,गुप्ता यांच्या भूमिका असलेल्या सोनाक्षीच्या सिनेमाचे शीर्षक आहे, 'खानदानी शफाखाना'.

सोनाक्षी सिन्हा

By

Published : Jun 12, 2019, 5:13 PM IST


मुंबई - 'दबंग' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या सोनाक्षी सिन्हाने आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. सध्या ती सलमान खानसोबत 'दबंग ३' च्या शूटींगमध्ये व्यग्र आहे. अशातच तिने आपल्या नव्या सिनेमाची घोषणा इन्स्टाग्रामवर केली आहे.

सोनाक्षीने एक फोटो पोस्ट करीत नव्या सिनेमाचे शीर्षक आणि त्याची रिलीज डेट घोषीत केले आहे. अभिनेता वरुण शर्मा, अन्नु कपूर, शिल्पी दास,गुप्ता यांच्या भूमिका असलेल्या सोनाक्षीच्या सिनेमाचे शीर्षक आहे, 'खानदानी शफाखाना'. यंदाच्या २६ जुलैला हा सिनेमा सर्वत्र रिलीज होईल. यात रॅपर बादशाहदेखील आहे.

फोटो सोनाक्षी सिन्हाच्या इन्स्टाग्राम सौजन्याने

सोनाक्षीने शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''केव्हापासून विचारत आहे, सिनेमाचे नाव काय ...सिनेमाचे नाव काय...हे मला सांगताना खूप आनंद होतोय की, 'खानदानी शफाखाना' २६ जुलैला रिलीज होत आहे.'' तिच्या या घोषणेनंतर कॉमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे. मात्र बादशाहने मिश्किलपणे कॉमेंट्स करीत आपला फोटो चांगला आला नसल्याची तक्रार केली आहे.

सध्या 'दबंग ३' च्या शूटींगमध्ये सोनाक्षी व्यग्र आहे. सलमानसोबतचा हा सिनेमा येत्या २० डिसेंबरला रिलीज होणार आहे. याचे दिग्दर्शन प्रभूदेवा करीत आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details