मुंबई -सध्या कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे जगभरातील कॉन्सर्ट, शूटिंग तसेच कलाकारांचे दौरे रद्द आहेत. त्यामुळे बरेच सेलिब्रिटी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहेत. गायिका सोना मोहापात्रा देखील सोशल मीडिया वर बऱ्यापैकी सक्रिय असते. लॉक डाऊनमुळे तिने आपल्या सोशल मीडिया पेज वर लाईव्ह शो चे आयोजन केले होते. यामध्ये हजारो युजर्स सहभागी झाले होते.
Lockdown : सोना मोहापात्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून आयोजित केला लाईव्ह शो - sona mohaptra news
तिने आयोजित केलेल्या शोमध्ये तिने स्पर्धकांना एक टास्क दिला होता. यामध्ये योग्य उत्तर देणाऱ्या 20 जणांची निवड करण्यात आली.
Lockdown : सोना मोहापात्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून आयोजित केला लाईव्ह शो
सोना मोहपत्रा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. तिने आयोजित केलेल्या शोमध्ये तिने स्पर्धकांना एक टास्क दिला होता. यामध्ये योग्य उत्तर देणाऱ्या 20 जणांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमानंतर तिने एक पोस्ट शेअर केली. अशा कठीण प्रसंगी सर्वांना मानसिक बळ देण्यासाठी संगीत उपयोगी पडेल, त्यामुळे सर्वांनी एकमेकांना सहकार्य करत खबरदारी बाळगावी असे तिने म्हटले आहे.