मुंबई - सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर सलमान खानने अलिकडेच प्रतिक्रिया दिली होती. त्याने ट्विट करीत सुशांतचे कुटुंबीय आणि चाहत्यांच्या मागे उभे राहण्याचे आवाहन केले होते. या ट्विटवर गायिका सोना महापात्राने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
तिने ट्विटमध्ये लिहिलंय, ''पोस्टर बॉयकडून एक मोठ्या मनाची पीआर मुव्ह! त्याच्या डिजिटल टीमने दुसऱ्यांना धमकवण्यासाठी पाठवलेल्या ट्विटची किंवा त्या धमकीबद्दल माफी मागण्याच्या ट्विटचीही गरज पडलेली नसेल. जेव्हाही तो वाईट पद्धतीने अडकतो, तेव्हा तो आपल्या वडिलांना पुढे करतो.''
सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडला आरोपीच्या पिंजऱ्या उभे करण्यात आले आहे. यातूनच सलमान खान, करण जोहर, एकता कपूर, संजय लीला भन्साळी, आदित्य चोप्रा, आलिया भट्ट, सोनम कपूर यासारख्या कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शकांवर घराणेशाहीचा आरोप केला जात आहे आणि भरपूर ट्रोलही केले जात आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर सलमानने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सलमानने शनिवारी रात्री ट्विटमध्ये लिहिले होते, ''मी माझ्या सर्व फॅन्सना विनंती करतो की, त्यांनी सुशांतवर प्रेम करणाऱ्यांच्या मागे उभे राहा. त्यांच्या भाषेवर किंवा टीकेवर न जाता या मागच्या भावना पाहा. कृपया त्याचे कुटुंबीय आणि प्रशांसकांचे समर्थन करा. कारण आपल्यातील कुणालाही हरवणे वेदनादायी असते.''
अलिकडेच गायक सोनू निगमने एक व्हीडिओ शेअर करीत सलमानवर आरोप केला होता. तो गायकांना त्रास देतो असे त्यात म्हटले होते.