महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

HBD Nana Patekar : नाना पाटेकरांच्या रंजक 'नाना गोष्टी'!! - Nana Patekar film career

ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांचा आजा 71 वा वाढदिवस आहे. गेली 47 वर्षे ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या नावाचा दबदबा राखून आहेत. रोखठोक बोलण्याची सवय असलेला हा अभिनेता अत्यंत हळव्या मनाचा आहे. साधी राहणी ही त्याची खासियत आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने नाना पाटेकरांबद्दलच्या काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात.

ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर
ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर

By

Published : Jan 1, 2022, 6:47 AM IST

Updated : Jan 1, 2022, 3:00 PM IST

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता नाना पाटेकरांचा 1 जानेवारी रोजी वाढदिवस असतो. सिनेजगतातील लोक जसा चकाचक वाढदिवस साजरा करतात त्या भानगडीत नाना कधी पडत नाहीत. आज ते 71 वर्षांचे झाले आहेत. सामाजिक भान असलेल्या नाना यांनी गेल्या काही वर्षापासून नाम फाऊंडेशन स्थापन करुन अभिनेता मकरंद अनासपुरेच्या सोबतीने मराठवाड्यातील ग्रामीण जनतेला दिलासा देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

मदतीसाठी हात पुढे करणारे नाना

मराठवाड्यातील सिंचनाच्या प्रश्नाबाबत नाना आणि नाम फाऊंडेशनने केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. शेकडो कोटींची मदत उभी करुन नानांनी अनेक नद्यांना पुरुर्जिवीत केले आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना भाऊ बनून आधार नाना देत आलेत. पुरग्रस्तांना मदत, निराधार महिलांना शेळ्या वाटप, सामुहिक विवाहसोहळ्यासारखे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. हजोरो शेतकऱ्यांची अश्रू पुसण्याचे काम नाना अविरतपणे करीत असतात.

नाम फाऊंडेशनच्या मार्फत समाजकार्य करणारे नाना

नाना पाटेकर यांनी १९७४ मध्ये मुझफ्फर अली दिग्दर्शित ‘गरमन’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत आपला प्रवास सुरू केला. पुढे, रघुवीर कुलचा 'मोहरे' (1987), मीरा नायरचा 'सलाम बॉम्बे!' (1988) यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तो दिसला, पण 'परिंदा' (1989) या चित्रपटात खलनायकाच्या जबरदस्त अभिनयामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला. या चित्रपटामुळे त्याला संपूर्ण उद्योगातून प्रशंसा मिळाली आणि त्याने या चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या श्रेणीसाठी फिल्मफेअर पुरस्कार जिंकला.

श्रमदान करणारे नाना

नाना पाटेकर यांनी अधूनमधून खलनायकाच्या भूमिकेत काम केले आहे, परंतु त्याच्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी नायकाची भूमिका देखील साकारली आहे. त्यांनी अग्नी साक्षी नावाच्या चित्रपटात एक धोकेबाज, पत्नीला मारहाण करणारा, क्रांतिवीरमध्ये जुगारी, खामोशी: द म्युझिकलमध्ये एक मूकबधिर पिता तसेच वजूदमध्ये स्किझोफ्रेनिकची भूमिकाही साकारली होती.

बीएसएफ जवानांसोबत नाना

माधुरी दीक्षित सह-अभिनेत्री असलेल्या प्रहार: द फायनल अटॅक या चित्रपटातून तो दिग्दर्शक बनला. अभिनेता म्हणून त्यांच्या इतर चित्रपटांमध्ये हु तू तू आणि ब्लफ मास्टर यांचा समावेश आहे. त्यांनी अपहरनमध्ये चांगला अभिनय केला, यासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्कार तसेच स्टार स्क्रीन अवॉर्ड सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला.

प्रेमळ नाना

नाना पाटेकरांबद्दल माहिती नसलेल्या काही रंजक गोष्टी

⦁ नाना पाटेकरच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती, जेव्हा त्यांनी उपजीविकेसाठी झेब्रा क्रॉसिंग आणि चित्रपटाची पोस्टर्स रंगवली होती. जेव्हा त्यांच्या वडिलांचा व्यवसाय बंद पडला तेव्हा नानांनी अर्धवेळ नोकरी केली. तिथे त्यांना दिवसाला फक्त 35 रुपये आणि फक्त एक जेवण मिळायचे.

⦁ जीवनातील जवळपास सर्व सुखसोयी परवडत असताना, नाना पाटेकर अजूनही 1 BHK अपार्टमेंटमध्ये राहणे पसंत करतात.

⦁ नानांनी त्यांच्या 'प्रहार' चित्रपटासाठी तीन वर्षांचे लष्करी प्रशिक्षण घेतले होते आणि त्यांना कॅप्टनचे मानद पद देण्यात आले होते.

⦁ नाना एक कुशल स्वयंपाकी आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या पाककृती बनवायला खूप आवडतात.

⦁ नानांनी आपल्या मुलाला चित्रपटसृष्टीत प्रस्थापित करण्यासाठी आपल्या स्टार पॉवरचा वापर केला नाही.

⦁ नाना पाटेकर यांना धूम्रपानाचे व्यसन आहे का? : नाही

⦁ नाना पाटेकर मद्यपान करतात का?: होय

⦁ त्यांचा जन्म मुरुड-जंजिरा येथे एका कपाड व्यावसायिकांच्या घरी झाला होता.

⦁ अभिनय क्षेत्रात येण्याआधी, नाना पाटेकर यांनी काही कमावण्यासाठी चित्रपटाचे पोस्टर रंगवणे, झेब्रा क्रॉसिंग पेंट करणे इत्यादी अनेक असामान्य कामे केली होती.

⦁ नाना पाटेकर यांनी एका जाहिरात संस्थेतही काम केले होते.

⦁ नाना 28 वर्षांचा असताना त्यांचे वडील निधन पावले.

⦁ त्यांच्या मल्हार नावाच्या मुलानेही प्रहारमध्ये नाना पाटेकरांच्या तरुणपणीची भूमिका साकारली होती.

⦁ यशवंत (1997), वजूद (1998) आणि आंच (2003) या चित्रपटांमध्ये पाटेकर यांनी पार्श्वगायनही केले आहे.

हेही वाचा -Bollywood Year Ender 2021: या वर्षात हिट आणि फ्लॉप झालेले चित्रपट

Last Updated : Jan 1, 2022, 3:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details