महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

म्हणून सोशल मीडियावर शेअर करत असते वर्कआऊट अपडेट, भूमीनं सांगितलं कारण - कार्तिक

भूमीनं नुकतंच वर्कआऊट करतानाचा आपला व्हिडिओ शेअर केला. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं म्हटलं, असे व्हिडिओ शेअर करण्यामागचं कारण आहे, प्रेरणा. हे शेअर केलेले व्हिडिओ मला आणखी मेहनत घेण्यासाठी प्रेरित करतात.

भूमी पेडणेकर

By

Published : Aug 31, 2019, 10:57 PM IST

मुंबई- अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या यशाच्या शिखरावर आहे. एकामागोमाग चित्रपट साईन केलेली भूमी आपल्या अनेक वर्कआउटचा व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. इतकंच नव्हे तर आपल्या चित्रपटांविषयीची प्रत्येक अपडेटही ती देत असते. असे केल्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळत असल्याचे भूमीने म्हटलं आहे.

हेही वाचा - रणवीरनं पूर्ण केलं ८३चं लंडन शेड्यूल, व्हिडिओ केला शेअर

भूमीनं नुकतंच वर्कआऊट करतानाचा आपला व्हिडिओ शेअर केला. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं म्हटलं, असे व्हिडिओ शेअर करण्यामागचं कारण आहे, प्रेरणा. हे शेअर केलेले व्हिडिओ मला आणखी मेहनत घेण्यासाठी प्रेरित करतात, असं ती म्हणाली.

दरम्यान भूमी लवकरच अनेक नव्या सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सांड की आँख सिनेमात ती तापसी पन्नूसोबत स्क्रीन शेअर करणार असून दिवाळीत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तर पती पत्नी और वोमध्ये ती कार्तिक आणि अनन्यासोबत झळकणार असून सध्या ती लखनौमध्ये आपल्या या सिनेमाचं चित्रीकरण करत आहे. याशिवाय आयुष्मानच्या बाला सिनेमातही ती झळकणार आहे.

हेही वाचा - निखळ प्रेमाची भावनिक झलक, छिछोरेमधील खैरियत गाणं प्रदर्शित

ABOUT THE AUTHOR

...view details