मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून रियाला २२ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रियाची रवानगी आज (बुधवार) भायखळ्याच्या तुरुंगात करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर बॉलिवूड कलाकारांनी रियाच्या बचावासाठी पुढाकार घेतला आहे. करिना कपूर खान, विद्या बालन, सोनम कपूर, अनुराग कश्यप, राधिका आपटे, हुमा कुरेशी, श्वेता बच्चन फरहान अख्तर यांच्यासह अनेक कलाकारांनी रियाला न्याय देण्याची मागणी केली आहे. या सगळ्यांकडून एक मेसेज ट्विट करण्यात आला आहे.
कलाकारांनी त्यांच्या ट्विटमध्ये समाजातील पितृसत्ताक पद्धतीचे वर्चस्व झुगारुन देण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे रिया चक्रवर्ती हिने परिधान केलेल्या टी-शर्टवरही हा मेसेज लिहण्यात आला होता. याशिवाय काही कलाकरांनी 'जस्टीस फॉर रिया' असा हॅशटॅग वापरला आहे.
या बॉलिवूड कलाकारांनी दिला रियाला पाठिंबा -
करिना कपूर खान, विद्या बालन, शिबानी दांडेकर, अनुराग कश्यप, सोनम कपूर, श्वेता बच्चन, दिया मिर्झा, शाहिन भट्ट, फरहान अख्तर, झोया अख्तर, अभय देओल, मलाईका अरोरा, अथिया शेट्टी आणि हुमा कुरेशी.