मुंबई- नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड चित्रपट ४ मार्च रोजी देशभर रिलीज झाला. पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर थोडासा थंड प्रतिसाद मिळत असताना जे प्रेक्षक सिनेमा पाहातात त्यांना मात्र तो खूप आवडल्याचे सांगतात. या चित्रपटाची कथा आणि अमिताभ बच्चन यांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला आहे. चित्रपटाची कमाई संथ गतीने सुरू झाली. पण वीकेंडला चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी झेप पाहायला मिळाली होती. रिलीजच्या सहाव्या दिवसानंतरही अमिताभ बच्चन यांचा हा चित्रपट चांगला कलेक्शन करत आहे. दरम्यान इंटरनेट मुव्ही डेटा बेस ( IMDb ) रेटींगही चित्रपटाचे उत्तम आहे. झुंड चित्रपटाला १० पैकी ९.३ आयएमडीबी रेटिंग मिळाले आहे.
'झुंड' हा चित्रपट दररोज 1 कोटींहून अधिक कमाई करत आहे. मंगळवारी या चित्रपटाने 1.30 कोटींची कमाई केली होती. सहाव्या दिवशी म्हणजेच बुधवारी या चित्रपटाने जवळपास तितकीच कमाई केली आहे. असा दावा केला जात आहे की 'झुंड' चित्रपटाने बुधवारी म्हणजेच सहाव्या दिवशी सुमारे 1 कोटी कमावले आहेत, त्यानंतर चित्रपटाची एकूण कमाई आता 10 कोटींच्या आसपास पोहोचली आहे.