महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

शाहरुख आणि आलियाला घेऊन भन्साळी पूर्ण करणार 'इन्शाल्लाह'? - इन्शाल्लाह चित्रपटात आलिया

दोन दशकांनंतर चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी आणि सलमान खान या चित्रपटात एकत्र काम करणार होते. मात्र चित्रपटाला सुरुवात करण्यापूर्वीच हे काम थांबले आहे. आता भन्साळींनी हा चित्रपट दुसऱ्या खानसोबत पूर्ण करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. मात्र आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार होती, ती अद्यापही या कास्टमध्ये तशीच आहे.

Alia and SRK
शाहरुख आणि आलिया

By

Published : Feb 1, 2021, 7:33 PM IST

मुंबई - इन्शाल्लाह हा चित्रपट गुंडाळल्यानंतर सलमान खान आणि संजय लीला भन्साळी यांचे पुन्हा एकत्र येणे अद्याप तरी टळले आहे. पण हाच चित्रपट भन्साळी आता शाहरुख खान आणि आलिया भट्टला घेऊन पूर्ण करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार संजय लीला भन्साळी इन्शाल्लाह हा चित्रपट कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याच्या विचारात आहेत. ही एक कालातीत सुंदर प्रेमकथा आहे. या चित्रपटातून सलमान खान बाहेर पडल्यानंतर भन्साळी यांनी आलिया भट्टला या चित्रपटात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असून सलमानच्या जागी दुसऱ्या कलाकाराचा विचार सुरू केला आहे.

या अहवालात असेही म्हटले आहे की, इन्शाल्लाह चित्रपट आलियाला तिचा डियर जिंदागी कोस्टार एसआरके बरोबर पुन्हा एकत्र आणू शकेल. कारण ही भूमिका त्याच्या 50 च्या दशकात असलेल्या विशाल स्टारची मागणी करेल आणि शाहरुख खान यासाठी पूर्णपणे योग्य ठरेल. प्रेक्षकांनी आधीच आलिया आणि एसआरकेला एका चित्रपटात एकत्र पाहिले असल्यामुळे दोन पिढ्यातील आव्हानात्मक सुपरस्टारची जुगलबंदी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरु शकते.

२०१९ मध्ये भन्सालीबरोबर सर्जनशील मतभेदांमुळे सलमानने इन्शाल्लाह चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला होता. हम दिल दे चुके सनम या चित्रपटात १९९९ मध्ये दोघांनी एकत्र काम केले होते. त्यानंतर सावरिया या २००७ मध्ये आलेल्या चित्रपटात सलमानने पाहुणा कलाकार म्हणून छोटी भूमिका साकारली होती.

हेही वाचा - महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही नाही, निवडणूक असलेल्या राज्यांसाठी हात सैल - भुजबळ

ABOUT THE AUTHOR

...view details