मुंबई - मेगास्टार अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता बच्चन हिने अभिषेक बच्चनसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेत. तिने लहानपणीचा एक फोटो शेअर करुन आठवणींना उजाळा दिलाय.
या फोटोत अभिषेक नुकताच रांगायला लागल्याचे दिसून येते. तीन चाकी सायकलवर राईड करताना तो दिसत आहे. ट्रॅक्टरच्या आकाराची ही सायकल चालवायला बहिण श्वेता मदत करताना दिसत आहे. श्वेताने इन्सटाग्रामवर हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केलाय.