मुंबई - बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका कनिका कपूरची कोरोनाची चाचणी अखेर निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे तिला रुग्णालयातून डस्चार्ज देण्यात आला आहे. कनिकाच्या यापूर्वी चार टेस्ट कोरोना पॉझिटिव्हच आल्या होत्या. मात्र, शनिवारी तिची पाचवी टेस्ट केली असता ती निगेटिव्ह आली. त्यानंतर पुन्ही एकदा तिची सहावी टेस्ट करण्यात आली. ती देखील निगेटिव्ह आल्याने तिला रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे.
कनिकावर लखनऊच्या संजय गांधी रुग्णालयात उपचार सुरू होते. येथील वैद्यकिय अधिकारी प्रोफेसर आर.के. धीमान यांनी सांगितले की, कनिकाचे रिपोर्टस आता निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे घरी जाण्यापर्वी पुन्हा एकदा तिची तपासणी करण्यात येईल. त्यानंतर तिला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.