मुबई - सिध्दार्थ मल्होत्रा लवकरच एक अॅक्शन थ्रीलरमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. चित्रपटाचे दिग्दर्शन वर्धन केतकर करणार असून भूषण कुमार आणि मुराद खेतानी याचे निर्माते आहेत.
सिध्दार्थचा हा आगामी चित्रपट मे महिन्यात सुरू होईल. २० नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज होईल. याची माहिती ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनीआपल्या ट्विटर हँडलवर दिली आहे.
सिध्दार्थने आपल्या ट्विटरवर भूषण कुमार आणि मुराद खेतानी यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. याच्याकॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, ''डबल ट्रबल...या इन्ट्रेस्टिंग थ्रिलरचा भाग आणताना आनंद होतोय.''
तामिळ चित्रपट 'थडम'चा हा हिंदी रिमेक आहे. 'थडम' २०१९ मध्ये रिलीज झाला होता. यात अरुण विजय, तान्या होप, स्मृति वेंकट आणि विद्या प्रदीप यांच्या प्रमुख भूमिका होत्या. एका युवकाच्या हत्येभोवती या सिनेमाची कथा गुंफण्यात आली आहे.