मुंबई- स्टूंडट ऑफ द ईअर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच 'मरजावाँ' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाबद्दलची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. यानंतर आता चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे.
सिद्धार्थनं केली 'मरजावाँ'मधील गाण्याच्या चित्रीकरणाला सुरूवात - MARJAAVAAN
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाबद्दलची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. यानंतर आता चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक कोमल नाहटा यांनी सेटवरील सिद्धार्थचा एक फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. 'मरजाँवा' हा एक अॅक्शन ड्रामा चित्रपट असणार आहे. यात सिद्धार्थच्या अपोझिट 'स्टूंडट ऑफ द ईअर २' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री तारा सुतारिया झळकणार आहे.
या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि ताराशिवाय रितेश देशमुख, रकुल प्रीत सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. मिलाप मिलन झवेरी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती मोनिशा अडवाणी, मधू भोजवानी आणि निखील अडवाणी करणार आहेत. हा चित्रपट येत्या २ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.