महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सिध्दार्थ मल्होत्रा, रश्मिका मंदान्नाचा 'मिशन मजनू'चा पहिला लूक - हेरगिरी थ्रीलर चित्रपट 'मिशन मजनू

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने त्याच्या आगामी हेरगिरी थ्रीलर 'मिशन मजनू'चा पहिला लूक शेअर केला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दोन महत्त्वपूर्ण गोष्टी घडणार आहेत. एक म्हणजे यातून दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा बहुप्रतीक्षित बॉलिवूडमधील पदार्पण होईल आणि दुसरे म्हणजे पुरस्कारप्राप्त अ‍ॅड फिल्ममेकर शंतनु बागची याचे दिग्दर्शिय पदार्पण असणारा हा चित्रपट असेल.

Mission Majnu, first look out
मिशन मजनू'चा पहिला लूक

By

Published : Dec 23, 2020, 3:05 PM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने आपल्या आगामी ‘मिशन मजनू’ या चित्रपटाचा पहिला लूक शेअर केला आहे. शंतनु बागची याच्या दिग्दर्शकिय पदार्पणाच्या या चित्रपटातून दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण होणार आहे.

खऱ्या घटनांवर आधारित हा हेरगिरी थ्रीलर चित्रपट आहे. कन्नडमधील 'अंजनी पुत्र' आणि तेलुगु चित्रपट 'गीता गोविंदम' यामुळे प्रसिध्दीच्या झोतात आलेली अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचे 'मिशन मजनू'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण होणार आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​मुख्य भूमिकेत असणारा हा चित्रपट १९७० च्या दशकात घडलेल्या खऱ्या घटनांनी प्रेरित झाला आहे. पाकिस्तानच्या मध्यभागी पार पडलेल्या भारताच्या सर्वात धाडसी मिशनची ही कहाणी आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध कायमचे बदलले.

आपल्या सोशल मीडियावर सिद्धार्थने चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले. "आमच्या गुप्तचर यंत्रणेने शत्रूच्या भूमीवर केलेली सर्वात प्राणघातक गुप्त कारवाई! मिशन मजनूचा पहिला लूक सादर करत आहे," असे अभिनेता सिध्दार्थने ट्विट केले आहे.

हेही वाचा - कुठे आणि कधी होणार सलमान-कॅटरिनाच्या 'टायगर ३' चे शुटिंग

परवीज शेख, असीम अरोरा आणि सुमित बथेजा यांनी लिहिलेल्या या चित्रपटात सिध्दार्थ मल्होत्रा रॉ एजंटची भूमिका साकारत आहे. 'मिशन मजनू'ची निर्मिती आरएसव्हीपी आणि गिल्टी बाय असोसिएशनने केली आहे आणि फेब्रुवारी २०२१ मध्ये हा चित्रपट शुटिंग फ्लोअरवर जाईल.

हेही वाचा - आयुष्यमान-वाणीने ४८ दिवसात आटोपले 'चंडीगड करे आशिकी'चे शुटिंग

ABOUT THE AUTHOR

...view details