मुंबई - करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या सिद्धार्थ मल्होत्राने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आजत्याचा ३५ वा वाढदिवस आहे. याच आनंदात त्याने आपल्या आगामी ''शेरशाह'' चित्रपटाचे पोस्टर चाहत्यांना भेट दिले आहे.
सिद्धार्थ मल्होत्राने फॅन्सला दिले खास बर्थडे गिफ्ट, शेअर केले ''शेरशाह''चे पोस्टर - सिध्दार्थ मल्होत्राने फॅन्सला दिले खास बर्थडे गिफ्ट, शेअर केले ''शेरशाह''चे पोस्टर
बॉलिवूडचा सुंदर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आपला ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या तो 'शेरशाह' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.
सिद्धार्थने आपल्या ट्विटर हँडलवर तीन पोस्टर्स प्रसिध्द केली आहेत. कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''मोठ्या पडद्यावर बलिदान आणि शौर्याचे रंग दाखवताना माझ्यासाठी अभिमानची आमि सन्मानाची गोष्ट आहे. कॅप्टन विक्रम मल्होत्रा यांना श्रध्दांजली देत त्यांचा जीवन प्रवासाच्या न ऐकलेल्या गोष्टी प्रेक्षकांसाठी 'शेरशाह'मधून घेऊन आलो आहोत. चित्रपट ३ जुलैला रिलीज होईल.''
कारगील युद्धात आपले अमुल्य योगदान देणाऱ्या विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. विष्णु वर्धन हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर, करण जोहर, हिरू जोहर, अपुर्वा मेहता, शब्बीर बॉक्सवाला, अजय शाह आणि हिमांशू गांधी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.