मुंबई - विनोदाच्या सर्व प्रकारांवर चित्रपट बनवत निखळ मनोरंजन करण्यासाठी ओळखले जाणारे इंद्र कुमार यांनी अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंग यांना एकत्रितपणे आपल्या आगामी ‘थँक गॉड’ या संदेशयुक्त विनोदी चित्रपटासाठी करारबद्ध केले असून त्याचे शुटिंगही नुकतेच सुरु झाले. अजय व राकुल यांनी याआधी एकमेकांसोबत काम केलेलं आहे. अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे प्रथमच एकत्र काम करीत असून त्यांची मैत्री तशी नवीनच आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा इंद्र कुमारच्या बहुप्रतिक्षित कॉमेडी 'थँक्स गॉड' चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी फिल्म सिटीमध्ये आला तेव्हा त्याला कळले की जवळच त्याचा ‘थँक गॉड’ चा सहकलाकार, अजय देवगण त्याच्या ‘मे-डे’ चे शूटिंग करतोय. बॉलिवूडमधील प्रचलित ज्युनियर-सिनियर शिष्टाचार पाळत लगेचच सिद्धार्थ मल्होत्रा अजय देवगनच्या सेटवर पोहोचला. सुदैवाने तिथे ‘लंच ब्रेक’ झालेला होता व सिद्धार्थला अजयसोबत ‘क्वालिटी टाईम’ घालवता आला. बऱ्याच काळानंतर अजय देवगण दिग्दर्शन करतोय व सिद्धार्थ ने ‘मे -डे’ बद्दल त्याच्याकडे चौकशी केली. अजय ने ही दोघांच्या ‘थँक गॉड’ बद्दल चर्चा केली व लवकरच तो त्या चित्रपटाच्या शूटसाठी उपलब्ध होईल असे सांगितले.