मुंबई -अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री तारा सुतारिया यांची जोडी 'मरजावां' चित्रपटात एकत्र झळकली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले होते. आता पुन्हा एकदा त्यांची जोडी 'मसक्कली' या गाण्याच्या रियक्रिएटेड व्हर्जनमध्ये पाहायला मिळणार आहे.
दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या 'दिल्ली 6' या चित्रपटातील हे मूळ गाणे आहे. ए. आर. रेहमान यांनी या गाण्याला संगीत दिले होते. तर, अभिषेक बच्चन आणि सोनम कपूर यांची जोडी यामध्ये दिसली होती.
आता या गाण्याचं रियक्रिएटेड व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ताराने या गाण्याचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.