हैदराबाद: रंग दे बसंती फेम अभिनेता सिद्धार्थला नेटिझन्सनी 'साऊथ का स्वरा' म्हटले आहे. त्याने जेव्हा आपली पोस्ट ट्विटरवर शेअर करीत असताना त्याने ही पोस्ट स्वरा भास्करला टॅग केली. त्यानंतर स्वरा भास्करने त्याला उत्तम प्रतिसाद दिला.
एका अभिनेत्रीव्यतिरिक्त, स्वरा भास्कर सामाजिक-राजकीय विषयांवर आवाज उठविणारी व्यक्ती म्हणून ओळखली जाते. असाच लौकिक दक्षिण भारतात सिद्धार्थने मिळवला आहे. कोणाचीही भीडभाड न बाळगता सिध्दार्थ आपली मते मांडत असतो. त्यामुळेच नेटिझन्सनी त्याला 'दक्षिण का स्वरा' असा टॅग दिला आहे आणि या नवीन ओळखीमुळे तो स्पष्टपणे आनंदी दिसत आहे.
शुक्रवारी, सिद्धार्थने ट्विटरवर लिहिले की, "हिंदी भाषिक जनता मला दक्षिण का स्वरा म्हणत आहे. फक्त स्पष्ट करतो की... मी आनंदाने कोठूनही किंवा केव्हाही स्वरा होईन. ती खूप छान आणि सुंदर आहे." स्वराने सिद्धार्थच्या ट्विटला प्रतिक्रिया देऊन कौतुक केले आणि लिहिले की, "तू भारतचा सिद्धार्थ आहेस आणि आम्ही तुझे आभारी आहोत! शिवाय तू हॉटी आहेस!"