मुंबई - अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Actor Siddhant Chaturvedi) हा स्वप्नवत जगात वावरताना दिसत आहे. झोया अख्तरच्या 'गली बॉय' मध्ये एमसी शेरच्या (MC Sher in Glley Boy) भूमिकेत प्रेक्षकांना तो खूप आवडला होता. त्याचे आगामी काही महिने अत्यंत व्यग्र वेळापत्रक असणारे आणि प्रसिध्दी मिळवून देणारे असणार आहेत.
लोकप्रियतेच्या कळासाकडे वाटचाल करताना सिध्दांतने सोशल मीडियावर स्वतःचे सिंहावलोकन केले आहे.
त्याच्या प्रवासाबद्दल बोलताना, सिद्धांत चतुर्वेदीने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक नोट शेअर केली आहे. त्यात त्याने लिहिलंय, “इनसाइड एज में बॉलिंग सिखी… गली बॉय में रॅप किया… बंटी और बबली में क्या? किसको ठगा भैया?! - किस्मत को ठगा है, और क्या. सबको लगा लड़का नौकरी पायेगा, सेटल हो जायेगा, कुंडली में व्यापार भी था… मगर लड़का तो अंदर से कलाकार ही था…”