महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कोरोनाची लागण झाल्यानंतर सिध्दांत चतुर्वेदीने दिली हेल्थ अपडेट - सिद्धांत चतुर्वेदी चे आगामी चित्रपट

अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी याला काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तो क्वारंटाईन झाला आणि वैद्यकिय उपचार घेत होता. आता तो बरा होत असल्याचे त्याने सोशल मीडियावरुन चाहत्यांना कळवले आहे.

Siddhant Chaturvedi
सिद्धांत चतुर्वेदी

By

Published : Mar 17, 2021, 12:43 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याने उपचार घेण्यास सुरुवात केली होती. सध्या त्याने आपल्या चाहत्यांना तब्येतीची अपडेट्स कळवली आहेत.

सिध्दांतने मंगळवारी आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात त्याने आपल्या एका डोळ्यावर हात ठेवला असून दुसऱ्या डोळ्याने तो कॅमेऱ्याला लूक देताना दिसतो. त्याने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, "अभी वॅक्सीन आने की खूशी हुई ही थी की...कोरोना बोला थप्पा!" असे लिहित त्याने बरा होत असल्याचा संदेश चाहत्यांना दिलाय.

सिद्धांत चतुर्वेदी हेल्थ अपडेट

कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर सिध्दांतने स्वतःला क्वारंटाईन केले होते. डॉक्टरांच्या ल्ल्यानुसार तो उपचार घेत होता. आता आपली तब्येत बरी होत असल्याचे त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले होते. अशा प्रकारे सिध्दांत चतुर्वेदीने आपले हेल्थ अपडेट चाहत्यांना दिले आहेत. याबद्दल त्याने सर्वांचे आभारही मानले आहेत.

बॉलिवूडच्या अनेक आघाडीच्या कलकारांना यापूर्वी या प्राणघातक आजाराचा संसर्ग झाला होता. रणबीर कपूर, रणवीर शौरी, नीतू कपूर, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, अर्जुन कपूर, मलाइका अरोरा आदी कलाकारांना या विषाणूची लागण झाली होती.

मार्च २०२० मध्ये 'बेबी डॉल' या गाण्यामुळे प्रसिद्धी मिळालेली बॉलिवूड गायिका कनिका कपूर ही कोरोना पॉझिटीव्ह झालेली पहिली बॉलिवूड सेलेब्रिटी ठरली होती.

कोविड -१ with मध्ये संक्रमित होणारी बॉलिवूडची पहिली ख्यातनाम व्यक्ती बनली.

दरम्यान, कामाच्या पातळीवर सिद्धांत आगामीकाळात ‘युध्रा’ मध्ये दिसणार आहेत. शकुन बत्राच्या पुढील अद्याप शीर्षक ठरले नसलेल्या चित्रपटात तो दीपिका पादुकोण आणि अनन्या पांडे यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याबरोबरच सिद्धांत कॅटरिना कैफ आणि ईशान खट्टर यांच्यासोबत 'फोन बूथ'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा - महाराष्ट्राची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीचे ‘हाकमारी’ करत निर्मितीक्षेत्रात पदार्पण!

ABOUT THE AUTHOR

...view details