महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

जान्हवी आणि खूशी बहिणी म्हणजे, ''तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना''!! - खूशी आणि जान्हवी कपूर

श्रीदेवीची मुलगी खूशी कपूर अभिनयाचे शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेली आहे. तिचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिची मोठी बहिण अभिनेत्री जान्हवी कपूरही सोबत गेली आहे. मात्र दोघींमध्ये सतत खटके उडत असतात त्यामुळे आठवड्याभरातच दोघी एकमेकींना कंटाळल्या आहेत.

Kapoor Sisters
जान्हवी आणि खूशी

By

Published : Mar 29, 2021, 6:46 PM IST

मुंबई- अभिनेत्री जान्हवी कपूरने शुटिंगमधून ब्रेक घेतला असून धाकटी बहिण खूशी कपूरसोबत अमेरिकेला निघून गेली आहे. अजून एक आठवडा झाला नाही आणि दोन्ही बहिणी एकमेकींच्या कंपनीत कंटाळल्यासारख्या दिसत आहेत.

यापूर्वी आज जान्हवीने इन्स्टाग्रामवर एक छोटा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दोन्ही बहिणी बेडवर पडलेल्या दिसत आहेत. हा व्हिडिओ जान्हवीने शूट केला असून यामध्ये खूशी फोनमध्ये बिझी दिसत आहे. खूशीचा पाय खेचताना जान्हवीचा चेहरा दुःखी दिसत आहे.

"मला असभ्य, अपरिपक्व, बालिश लहान बहिण आवडते. तिला संरक्षक, संवेदनशील, स्वतंत्र मोठी बहिण तशीच आवडते. परंतु जेव्ही मी कामात असते तेव्हाच ती मला गंभीरपणे घेते'', असे जान्हवीने लिहिले आहे.

वर्क फ्रंटवर जान्हवीने नुकतीच तिच्या आगामी ‘गुड लक जेरी’ चित्रपटाचे शूटिंग आहे. पंकज मट्टा लिखित आणि सिद्धार्थ सेनगुप्ता दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती आनंद एल राय यांनी केली आहे. यात दीपक डोबरियाल, मीता वशिष्ठ, नीरज सूद आणि सुशांत सिंगही आहेत.

हेही वाचा - आमिर खान सर्वांना समानतेची वागणूक देतो - एली अवराम

ABOUT THE AUTHOR

...view details