मुंबई - आयुष्यमान खुराणाचा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' मात्र निर्मात्यांना रिलीज होताच फटका बसला आहे. समलैंगिकतेचा विषय असल्यामुळे यावर बंदी घालण्याचा निर्णय काही देशात झालाय.
आयुष्यमानचा हा चित्रपट गे लव्ह स्टोरी आहे. यात आयुष्यमानने होमोसेक्सुअल मुलाची व्यक्तीरेखा साकारली आहे.
'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटाच्या निर्मात्यांनी दुबई आणि युएईमध्ये वितरकांसमोर किसींग सीन कापण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र चित्रपटाच्या विषयालाच आक्षेप असल्याचे कारण देत बंदीच्या निर्णयावर ठाम राहिले. त्यामुळे हा एक मोठा झटका मानला जातो.
पूर्व आशियाई देशामध्ये बॉलिवूड चित्रपटांची मोठी क्रेझ आहे. भारतीय, बांग्लादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांसह स्थानिक नागरिकही बॉलिवूड सिनेमाची प्रतीक्षा करीत असतात. यातून मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू मिळत असतो. आयुष्यमानच्या चाहत्यांची संख्याही इथे मोठी आहे. या पार्श्वभूमीवर बंदीचा निर्णय झाल्यामुळे 'शुभ मंगल ज्यादा सावधान'च्या गोटात नाराजी आहे.
'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटात समलैंगिकतेच्या विषयावर समाजात सकारात्मक विचार नेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या चित्रपटात आयुष्मान खुराणा और जितेंद्र कुमार के साथ गजराज राव, नीना गुप्ता, मानवी गागरू, पंखुड़ी अवस्थी, सुनीता राजवार, मनु ऋषि चड्ढा आणि नीरज सिंह यांच्या भूमिका आहेत. याचे दिग्दर्शन हितेश केवल्या यांनी केलंय.