मुंबई - विविध व्यक्तीरेखा साकारत सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला अभिनेता आयुष्यमान खुराणाचा आगामी 'शुभ मंगल जादा सावधान' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.
'शुभ मंगल जादा सावधान'चे पहिले गाणे रिलीज, आयुष्यमान बनला 'गबरु'!! - आयुष्यमान बनला 'गबरु'
अभिनेता आयुष्यमान खुराणाच्या आगामी 'शुभ मंगल जादा सावधान' चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे. पंजाबी गाण्याचे हे रिक्रिएटेड गाणे आहे.
आयुष्यमान बनला 'गबरु'
'शुभ मंगल जादा सावधान' चित्रपटातील 'गबरु' हे गाणे ठेका धरायला लावते. यातील आयुष्यमानचा एनर्जीक परफॉर्मन्स प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडणारा आहे. हे पंजाबी गाण्याचे रिक्रिएशन आहे.
या चित्रपटात आयुष्यमान गे व्यक्तीरेखा साकारत आहे. २०१७ मध्ये आलेल्या 'शुभ मंगल जादा सावधान' या चित्रपटाचा पुढील भाग आहे. यात त्याने भूमी पेडणेकरसोबत स्क्रिन शेअर केले होते. २१ फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे.