मुंबई -अभिनेत्री श्रुती हासनच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. सोशल मीडियावर तिने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांच्या बऱ्याच प्रतिक्रिया पाहायला मिळतात. मात्र, अलीकडेच श्रुतीने एक पोस्ट शेअर करून तिच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली असल्याचं सांगितलं आहे. तिच्या पोस्टनंतर काही जणांनी तिला ट्रोलर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्रुतीने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देणारी एक पोस्ट शेअर केली आहे.
श्रुतीने या पोस्टमध्ये लिहलंय, की 'मी माझ्या मागच्या पोस्टनंतर लगेच ही पोस्ट शेअर करत आहे. मी दुसऱ्यांच्या विचारधारेनुसार चालणारी व्यक्ती नाही. मात्र, काही लोकांना तुम्हाला योग्य वेळी उत्तर द्यावेच लागते. हेच लोक जेव्हा तुम्हाला तू खूप जाड आहेस, ती खूप बारीक आहे यांसारख्या प्रतिक्रिया द्यायला लागतात. तेव्हा या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं त्रासदायक ठरू शकतं. हे दोन्ही फोटो मी तीन दिवसांच्या फरकानंतर काढले आहेत'.
हेही वाचा -बॉलिवूडचं 'हे' कपल लवकरच अडकणार लग्नबंधनात