अभिनेत्री श्रीदेवीचा स्मृतिदिन नुकताच पार पडला. सिंगापूरच्या मादाम तुसाद म्युझियममध्ये तिचा मेणाचा पुतळा तयार करून ठेवणार असल्याचं म्युझियमच्या वतीने ठरवण्यात आले होते.
पुतळ्यातली आई पाहून श्रीदेवीच्या मुली झाल्या भावूक - श्रीदेवीची मुलगी
सिंगापूर येथाल मादाम तुसाद संग्रहालयात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी बोनी कपूर, जान्हवी आणि खूशी भावूक झाले होते.
त्यानुसार नुकताच या पुतळ्याचे श्रीदेवीच्या मुली जान्हवी आणि खूशी यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आलं. श्रीदेवीच्या गाजलेल्या 'हवाहवाई लूक' मधील हा पुतळा आहे. यावेळी आईचा पुतळा पाहून जान्हवी आणि खूशी दोघी भावुक झाल्या. तर श्रीदेवीचे पती बोनी कपूर हेदेखील तिच्या आठवणीत हरवले.
याशिवाय म्युझियमच्या वतीने श्रीदेवी यांच्या जगभरातील फॅन्सच्या तिच्याबद्दलच्या भावना एकत्रित करून त्याचा एक भव्य कोलाज तयार केला आहे. श्रीदेवीच्या स्मृतीने काही काळ या म्युझियम मधील वातावरण पुरते भारावून गेले.