मुंबई- असं म्हटलं जातं की दुनिया गोल है, त्यामुळं प्रत्येक गोष्ट फिरून तुमच्याकडे येतेचं. असंच काहीसं झालं मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेसोबत. ओम शांती ओम या सुपरहिट चित्रपटात शाहरूखच्या खास मित्राची भूमिका साकारलेला श्रेयस तळपदे आता लवकरच शाहरूखचा मुलगा आर्यन खानच्या खास मित्राचीही भूमिका साकारणार आहे.
बारा वर्षांपूर्वी शाहरूखचा खास मित्र होतो, आता आर्यनचा - श्रेयस तळपदे - voice
‘द लायन किंग’चा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटातील पात्रांसाठी अनेक बॉलिवूड कलाकार आपला आवाज देणार आहेत. चित्रपटातील सिंबा या मुख्य पात्रासाठी आर्यन खानचा आवाज वापरला जाणार आहे
‘द लायन किंग’चा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटातील पात्रांसाठी अनेक बॉलिवूड कलाकार आपला आवाज देणार आहेत. चित्रपटातील सिंबा या मुख्य पात्रासाठी आर्यन खानचा आवाज वापरला जाणार आहे. तर सिंबाचा खास मित्र असलेल्या टिमॉनसाठी श्रेयस तळपदे आवाज देणार आहे. तर यातीलच मुफासाच्या पात्रासाठी शाहरूखचा आवाज असणार आहे.
याच पार्श्वभूमीवर ट्विट करत श्रेयसनं १२ वर्षांपूर्वी शाहरूखच्या खास मित्राची भूमिका साकारली तर आता शाहरूखचा मुलगा आर्यनच्या खास मित्राची भूमिका साकारत असल्याचे म्हटले आहे. यासोबतच जग गोल आहे, असंही त्यानं म्हटलं आहे.