मुंबई - दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या शवगृहात जाण्याबद्दल महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने (एसएचआरसी) मुंबई पोलीस आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेला फटकारले आहे. बुधवारी एका अधिकाऱ्याने सांगितले की, आयोगानेही यासंदर्भात दोघांकडून स्पष्टीकरण मागितले आहे. इतकेच नव्हे, तर एसएचआरसीने पोलीस आणि नागरी अधिकाऱ्यांनाही सोमवारपर्यंत या प्रकरणात त्यांचा सविस्तर उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
आयोगाचे कार्यवाह अध्यक्ष एमए सईद यांनी या प्रकरणाची वृत्तसंस्थेला पुष्टी केली आहे.
अधिकृत सूत्रांनी सांगितले की, १४ जून रोजी रिया चक्रवर्ती विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयाच्या शवागारात गेल्याचे व्हिडिओ आणि बातम्या आयोगाच्या उच्च अधिकाऱ्यांनी पाहिल्या आहेत. नंतर मृतदेहाच्या कुटूंबातील सदस्यांनाच शवगृहात जाण्याची परवानगी असल्याने आयोगाने कायदेशीर शाखेला याची चौकशी करण्याचे निर्देश दिले.