मुंबई- 'एबीसीडी' आणि 'एबीसीडी २' या चित्रपटांना मिळालेल्या तुफान यशानंतर आता याच पठडीतील 'स्ट्रीट डान्सर' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात 'एबीसीडी २' मधील कलाकार वरूण आणि श्रद्धा हेच मुख्य भूमिकेत झळकणार असून या चित्रपटासाठी श्रद्धा प्रचंड मेहनत घेत आहे.
'स्ट्रीट डान्सर'साठी श्रद्धा कपूर घेतीय प्रचंड मेहनत, वरूणने केला फोटो शेअर - varun dhawan
श्रद्धाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यात वेगवेगळे स्टंट आणि डान्स स्टेप करत आहे
आता श्रद्धाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यात वेगवेगळे स्टंट आणि डान्स स्टेप करत आहे. ही पोस्ट शेअर करत श्रद्धाने त्याला 'उल्टा पुल्टा' असं कॅप्शन दिलं आहे. यासोबतच वरूणनेदेखील श्रद्धाचा फोटो शेअर केला आहे, जो श्रद्धाने रिपोस्ट केला आहे.
श्रद्धाने नुकतंच या चित्रपटाचं पंजाबमधील पहिलं शेड्यूल पूर्ण केलं आहे. श्रद्धा आणि वरूणशिवाय या चित्रपटात नोरा फतेही, अपारशक्ती खुराना आणि शक्ती मोहन यांच्याही भूमिका आहेत. नृत्य दिग्दर्शक आणि अभिनेता प्रभूदेवा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.