मुंबई- दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला साहो सिनेमा ३० ऑगस्टला प्रदर्शित झाला. हिंदीसह तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. याचसाठी श्रद्धाने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
हेही वाचा - चुकांमधूनच शिकत गेलो, साहोच्या दिग्दर्शकाची भावनिक पोस्ट
श्रद्धानं सिनेमातील आपला प्रभाससोबतचा फोटो शेअर करत त्याला कॅप्शन दिलं आहे. कॅप्शनमध्ये श्रद्धा म्हणाली, प्रेक्षकांचे खूप खूप आभार. साहोला दिलेल्या भरभरुन प्रतिसादासाठी आणि प्रेमासाठी. सुजित यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाने आतापर्यंत ३५० कोटींचा गल्ला पार केला आहे.
हा बहुचर्चित सिनेमा ३५० कोटींच्या बिग बजेटमध्ये तयार झाला आहे. चित्रपटातील भव्य दिव्य सेट आणि प्रभासमुळेच प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहात होते. सिनेमाच्या केवळ हिंदी व्हर्जननेच ५ दिवसात बॉक्स ऑफिसवर शतक गाठलं होतं. सिनेमाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड अद्यापही सुरुच आहे.
हेही वाचा - ६ दिवसात 'साहो'नं पार केला ३०० कोटींचा आकडा