मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरनं यंदा आपल्या तीन बहुचर्चित चित्रपटांचं चित्रीकरण केलं. यात 'साहो', 'छिछोरे' आणि 'स्ट्रीट डान्सर' या सिनेमांचा समावेश आहे. यामुळे हे वर्ष आपल्यासाठी शारिरीकदृष्ट्या कष्टादायी ठरलं असल्याचं श्रद्धानं म्हटलं आहे.
श्रद्धा म्हणते, काही काळ चित्रपटांतून विश्रांती घेण्याचा विचार - बहुचर्चित चित्रपट
एकाच वर्षात मी या तीन चित्रपटांचं चित्रीकरण पूर्ण केलं. अशात शारिरीकदृष्ट्या थकल्यामुळं मी काही काळ चित्रपटांच्या चित्रीकरणातून विश्रांती घेण्याचा विचार केला, मात्र इतक्यात साहोच्या प्रमोशनला सुरुवात झाली,असं श्रद्धा यावेळी म्हणाली.
![श्रद्धा म्हणते, काही काळ चित्रपटांतून विश्रांती घेण्याचा विचार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4109160-thumbnail-3x2-shraddha.jpg)
माझ्या शरीरात वेदना होत आहेत. एकाच वर्षात मी या तीन चित्रपटांचं चित्रीकरण पूर्ण केलं. अशात शारिरीकदृष्ट्या थकल्यामुळं मी काही काळ चित्रपटांच्या चित्रीकरणातून विश्रांती घेण्याचा विचार केला, मात्र इतक्यात साहोच्या प्रमोशनला सुरुवात झाली. साहो या बहुचर्चित चित्रपटाचा भाग असल्याचा मला आनंद आहे, असं श्रद्धा यावेळी म्हणाली.
यासोबतच 'साहो' हा माझा असा पहिला चित्रपट आहे, जो एकाच वेळी इतक्या भाषांत प्रदर्शित होत आहे. त्यामुळे एका अशा सिनेमाचा भाग बनून अभिमान वाटतं असल्याचं तिनं म्हटलं. दरम्यान 'साहो' चित्रपट येत्या ३० ऑगस्टला हिंदीसह तेलुगू, तमिळ आणि मल्ल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.