महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'नाचू मैं आज छम छम', पाहा लक्ष्मी अगरवालचा डान्स व्हिडिओ - acid attack

अभिनेत्री श्रद्धा कपूरने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात लक्ष्मी 'नाचू मैं आज छम छम छम' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे

लक्ष्मी अगरवालचा डान्स व्हिडिओ

By

Published : Apr 3, 2019, 12:51 PM IST

मुंबई- अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालवर लवकरच चित्रपट येणार आहे. यात दीपिका लक्ष्मीच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला होता. हा लूक पाहून सर्वच थक्क झाले. यानंतर आता लक्ष्मीचा डान्स व्हिडिओ समोर आला आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूरने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात लक्ष्मी 'नाचू मैं आज छम छम छम' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. श्रद्धाच्या बागी चित्रपटातील हे गाणं आहे. या गाण्यावरील लक्ष्मीचा हा डान्स प्रेक्षकांना थक्क करणारा आहे.

श्रद्धाने आपल्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट करताच काही वेळातच तो वाऱ्यासारखा व्हायरल झाला. या व्हिडिओला सोशल मीडियावर प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. दरम्यान मेघना गुलजार यांच्या 'छपाक'मधून लक्ष्मीची कथा लवकरच मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details