मुंबई- 'एबीसीडी २' चित्रपटानंतर श्रद्धा पुन्हा एकदा डान्सवर आधारित चित्रपटात झळकण्यास सज्ज झाली आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली असून श्रद्धा डान्स शिकण्यासाठी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे. नुकतेच श्रद्धाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून डान्सचा सराव करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
'स्ट्रीट डान्सर'साठी श्रद्धा करतीये सराव, व्हिडिओ केला शेअर - share
नृत्य दिग्दर्शक प्रभूदेवा 'स्ट्रीट डान्सर' चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. श्रद्धा आणि वरूणशिवाय या चित्रपटात नोरा फतेही, अपारशक्ती खुराना आणि शक्ती मोहन यांच्याही भूमिका आहेत
या व्हिडिओतील तिचा डान्स नक्कीच तिच्या चाहत्यांची मनं जिंकणारा आहे. दरम्यान या चित्रपटात श्रद्धा कपूरच्या अपोझिट वरूण धवन झळकणार आहे. 'एबीसीडी २' चित्रपटातही वरूण आणि श्रद्धाने स्क्रीन शेअर केली होती. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरली होती.
नृत्य दिग्दर्शक प्रभूदेवा 'स्ट्रीट डान्सर' चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. श्रद्धा आणि वरूणशिवाय या चित्रपटात नोरा फतेही, अपारशक्ती खुराना आणि शक्ती मोहन यांच्याही भूमिका आहेत. प्रेक्षक वरूण आणि श्रद्धाच्या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.