मुंबई- अभिनेत्री श्रद्धा कपूर काही दिवसांपूर्वीच साहो सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. श्रद्धाच्या या पहिल्याच दाक्षिणात्य सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. यानंतर नुकताच तिचा छिछोरे सिनेमा रिलीज झाला. या चित्रपटानेदेखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता श्रद्धा आपल्या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाली आहे.
साहो अन् छिछोरेच्या यशानंतर 'बागी ३'साठी श्रद्धा कपूर सज्ज - बागी ३
श्रद्धा म्हणाली, एबीसीडी चित्रपटाचा सिक्वल स्ट्रीट डान्सर येत्या जानेवारीमध्ये प्रदर्शित होत आहे. याशिवाय येत्या ३ ते ४ दिवसात मी बागी ३च्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.
एका मुलाखतीत बोलताना श्रद्धाने आपल्या आगामी सिनेमांविषयीची माहिती दिली. श्रद्धा म्हणाली, एबीसीडी चित्रपटाचा सिक्वल स्ट्रीट डान्सर येत्या जानेवारीमध्ये प्रदर्शित होत आहे. याशिवाय येत्या ३ ते ४ दिवसात मी बागी ३च्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.
हे दोन्ही सिनेमे माझ्याच पूर्वीच्या चित्रपटांचे सिक्वल असल्याने त्याच कलाकारांसोबत तसेच टीमसोबत पुन्हा एकदा काम करण्यासाठी उत्सुक असल्याचेही तिनं म्हटलं. याशिवाय छिछोरे आणि साहोच्या यशावर प्रतिक्रिया देत, आपण खूप आनंदी असल्याचंही श्रद्धानं सांगितलं.