अक्षय कुमार एक असा नट आहे जो सिनेमांच्या चित्रीकरणांमध्ये वेळ फुका घालवत नाही. गेल्यावर्षी लॉकडाऊन मध्ये चित्रीकरणांना परवानगी मिळाल्यानंतर त्याने लंडनमध्ये जाऊन ‘बेलबॉटम’ पूर्ण केला. तो चित्रपट कोरोना कालखंडातील लॉकडाऊन मध्ये चित्रित होणारा जगभरातील पहिला चित्रपट होता. अक्षय एका चित्रपटाचे चित्रीकरण संपवून लगेचच दुसऱ्या चित्रपटाच्या कमला लागतो. गेल्या दिडएक वर्षात कोरोना कालखंडात त्याने जवळपास अर्धा डझन चित्रपट पूर्ण केलेत आणि आता अक्षयने अजून एका चित्रपटाचे शूटिंग संपविले आहे.
अक्षय कुमार आणि निर्माता-दिग्दर्शक आनंद एल राय यांनी त्यांच्या आगामी रक्षाबंधन चित्रपटाचे चित्रीकरण दिल्लीत पूर्ण केले आहे. या वर्षी जूनमध्ये मुंबई परिसरात एका मोठ्या सेटवर चित्रपटाच्या शूटिंग ला सुरवात करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी अक्षय याच चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान चांदणी चौकातील रस्त्यांवर धावताना दिसला होता, त्याचा हा फोटो बराच व्हायरल झाला होता. नुकत्याच मिळालेल्या माहितीवरून असे कळून आले आहे की दिल्लीमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे.