मुंबई- अमिताभ बच्चन यांनी पत्नी जया बच्चन आणि मुलगी श्वेतासमवेत शूटिंगचे अनेक फोटोशेअर केले आहेत. कुटुंबासोबतकाम करताना समरसता तयार होत असल्याचे त्यांनी म्हटलंय. शूटच्या वेळचे फोटो बिग बी यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत तिघेही पारंपरिक कपड्यांमध्ये दिसत आहेत. यावेळी सेटवर घेण्यात आलेली सुरक्षततेची काळजीही फोटोत दिसून येत आहे.
हेही वाचा - शाकाहारी भोजनामुळे फिट आणि निरोगी - मानुषी छिल्लर
एका फोटोमध्ये बिग बी पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि दिसत आहेत. जया बच्चन यांनी गुलाबी रंगाची साडी नेसलेली असून श्वेताही सुंदर दिसत आहे. दुसर्या फोटोमध्ये अमिताभ पांढर्या रंगाचा कुर्ता परिधान केलेले दिसत असून जया हिरव्या साडीमध्ये दिसल्या आहेत, तर श्वेता क्रीम रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
बिग बीने ट्विटरवर या फोटोंसह एका पोस्टमध्ये लिहिले आहे, ''फॅमिली कामात व्यग्र आहे.''
हेही वाचा -'आश्रम' वेब सिरीजच्या तिसऱ्या सिझनची बॉबी देओलला प्रतीक्षा